Ad will apear here
Next
साडे तीन हजार पेन्सिलींतून साकारले चित्र
खोडरबर आणि पेन्सिलीतून साकारले भारतीय जवानाचे चित्रपुणे : येथील कलातीर्थ संस्थेतर्फे ‘मैत्र जीवाचे’ हे चित्र प्रदर्शन बालगंधर्व  कलादालनात  भरविण्यात आले असून, यातील सुमारे तीन हजार पाचशे खोडरबर आणि पेन्सिली यांचा वापर करून रेखाटण्यात आलेले भारतीय जवानाचे चित्र विशेष आकर्षण ठरत आहे.

कलातीर्थ संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांनी साकारलेली सुमारे शंभर चित्रे आणि शिक्षकांनी तयार केलेली व्यक्ती तसेच, निसर्गचित्रे येथे पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. या मुलांच्या पालकांनी संस्थेला वह्या, पुस्तके, पेन्सिल, खोडरबर हे साहित्य दिले असून, हे प्रदर्शन पूर्ण झाल्यानतंर हे सर्व साहित्य नगर येथील स्नेहालय अनाथ आश्रमातील मुलांना दिले जाणार आहे.

शनिवार ते सोमवारपर्यंत (ता. ३०) चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध मान्यवर कलाकार चित्रे रेखाटणार असून ते मुलांना मार्गदर्शनही करणार आहेत. 

 (‘मैत्र जीवाचे’ या प्रदर्शनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZKXBN
Similar Posts
पुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’ पुणे : गाजलेल्या नाटकांच्या, पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातील नाट्यसत्ताक रजनी यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मोठ्या उत्साहात पार पडली.
अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन औंध : आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत औंध येथील रिलायन्स मार्टच्या बाजूला पीएन गाडगीळ अँड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सुरू असेल.
‘महात्मा फुले संग्रहालयात होणार कायमस्वरूपी कलादालन’ पुणे : ‘महात्मा फुले वस्तू संग्रहालयात एक विभाग चित्रांसाठी ठेवण्यात आला आहे. हे संग्रहालय सरकारी असले, तरी शासनाची कोणतीही मदत न घेता आम्ही त्याची दुरुस्ती केली आहे. पुणे शहराची ओळख असलेल्या या संग्र्हलायातील या चित्र दालनात आधीच काही चित्र आहेत; परंतु ही जागा आम्ही कायमस्वरूपी कलादालनासाठी देऊ इच्छित आहोत
वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन पुणे : वैद्य प. य. वैद्य खडीवाले लिखित आणि डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ‘आयुर्वेदीय वनौषधी’ (सचित्र वनस्पतींची उपयुक्तता), ‘सहजसोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ आणि ‘एटूझेड आरोग्यवर्धिनी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन व वैद्य खडीवाले यांचे सर्वांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी , ९

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language